मधुकर भावे माझे पिता
कै मधुकर भावे माझे पिता कशी बोलवू मी त्यांना आत्ता बघण्या साठी माझी इच्छा पूर्ती "मधुर भाव " रूपे घडवली कलाकृती निर्मिती मधुर भाव वृद्धाचे घर केवळ आपला वरद हस्त थोर त्याच्यात च संतोष वाटे मना फार थोडेसे ऋण फेडयांसाठी संधी अपार आपणा प्रति अन्याय नाही झाला सहन विचाराची शृंखला झाली मनी गहन निश्चय केला हाल अपेष्ठा करण्या हनन उचलली पावले थोर पित्यास स्मरून मधुर भाव हि वस्तू वयस्कर लोकांसाठी समस्या व्यथा त्यांचाच जाणून घेण्यासाठी मुंबई ला प्रयाण केले अभ्यासा साठी पूर्ण करून अभ्यास परतले कृती साठी अजामिती दोन ठिकाणी आश्रम वसविले वस्तीस आले त्यांचे बस्तान बसविले वेळोवेळी हर्षमोदने हि हसवले आश्रमात आल्यामुळे नाही कोणी पस्तावले पिताश्री एकाच विनंती तुमचा चरणी कधीच नाही होणार ऋणफेड भरणी क्षमा असावी अंजली ला हीच मुख्य मागणी धन्य झाले जन्म घेऊनि माधुरी मातेचा उदरी...