Age with Grace आयुष्यातील सर्वात मोलाची संपत्ती म्हणजे सुद्रुढ आरोग्य. आजची वेगाने बदलत असलेली जीवनशैली , आणि त्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी धावणारे आपण. अनेक प्रकारचे पदार्थ आज बाजारात आहेत , पण शरीराला गरजेची असलेले पौष्टिकता त्यात दुर्मीळच. या सार्याचा परीणाम स्वरूप , अकाली आपल्या पैकी अनेकांना , मणक्याचे आजार , जसे स्पोंडीलायटीस , स्पाईन-नर्वह डिप्रेशन , तर कधी गुडघे दुखी , सांधे दुखी आणी असे बरेच त्रास होतात. यामुळे , अनेक बंधने येऊ लागतात ; शरीरावर आणि जीवनशैली वर देखील. अशा परिस्थितीत स्वःला वेळ देणे , योग्य काळजी घेणे हेच आजच्या काळात अवघड होऊन बसले आहे , तर आपल्या कुटुंबातील लोकांना हवे-नको बघणे , वेळ देणे , आजार पणात व त्या नंतरची काळजी लक्षपूर्वक आणि आपुलकीने घेणे तितकेच महत्वाचे आहे पण ; हे कसे जमवायचे ? त्यांची व स्वःची आबाळ न होऊ देता कसे निभवायचे ? ही काळजी सत्त असते. मधुरभाव कुटुंब , गेले 3 वर्ष , व्रुद्धांसाठी आणि व्रुद्धां बरोबर , नावात असलेल्याला मधुर भावनेने काम करीत आहे. येथे , त्या...