त्यांच्या गरजेला आणि तुमच्या काळजीला, आमचे समाधान- "मधुरभाव"
Age with Grace |
अनेक प्रकारचे पदार्थ
आज बाजारात आहेत, पण शरीराला गरजेची असलेले पौष्टिकता त्यात दुर्मीळच.
या सार्याचा परीणाम
स्वरूप, अकाली आपल्या पैकी अनेकांना, मणक्याचे आजार,
जसे स्पोंडीलायटीस, स्पाईन-नर्वह
डिप्रेशन, तर
कधी गुडघे दुखी,सांधे दुखी आणी असे बरेच त्रास होतात. यामुळे, अनेक बंधने येऊ
लागतात ; शरीरावर
आणि जीवनशैली वर देखील.
अशा परिस्थितीत
स्वःला वेळ देणे, योग्य काळजी घेणे हेच आजच्या काळात अवघड होऊन बसले
आहे,तर
आपल्या कुटुंबातील लोकांना हवे-नको बघणे,वेळ देणे, आजार पणात व त्या नंतरची काळजी
लक्षपूर्वक आणि आपुलकीने घेणे तितकेच महत्वाचे आहे पण; हे कसे जमवायचे?
त्यांची व स्वःची
आबाळ न होऊ देता कसे निभवायचे? ही काळजी सत्त असते.
मधुरभाव कुटुंब, गेले 3 वर्ष, व्रुद्धांसाठी आणि
व्रुद्धां बरोबर, नावात असलेल्याला मधुर भावनेने काम करीत आहे. येथे, त्यांच्या मानसिक,शाररिक आणि भावनिक
गरजा लक्षात घेऊन काम केले जाते. आनंदी आणि सक्रीय आयुष्य जगण्याची ईच्छा
सगळ्यांना असते. मात्र आजार, एकटेपण आणि त्यांने निर्माण होणारी
असहायता, निराश
करते. या कटू अनुभवाला मधुर करण्याचा विडा मधुरभावने उचलला आहे.
एकट्या आजारी
आईवडिलांची काळजी, परदेशात राहणार्या मुलांना सतावते. नोकरदार
दाम्पत्यांही बाहेर न निघता येणे, कारण घरी व्रुद्ध -आजारी व्यक्ती आहेत, तर कधी लग्न कार्य
आहे किंवा स्वःला एखाद्या वैद्यकीय मदतीची गरज आहे,
मात्र घरात आजारी
वडीलधारी मंडळी आहे त्यांना सोडून जाता येत नाही. असे अनेक प्रश्न निर्माण होत
असतात.
या सारखा प्रश्नांवर
उत्तर म्हणून मधुरभाव या वर्षी सुरु करत आहे,
"पोस्ट ऑपरेटिव्ह
रिकव्हरी" यासाठी एक विशिष्ट शाखा. येथे पॅलियाटीव्ह केर (वैद्यकीय
शसत्रक्रियां नंतरची काळजी ) आणि हाॅसपाईस केर (रुग्णांची काळजी) यात विशेष काम
केले जाईल. अतिशय कर्तव्यनिष्ठ, धैर्यशील, पात्र असे करमचारी वर्ग या कामात निपुण
आहेत.
प्रत्येक
कुटुंबीयांची गरज समजून, त्याचा लक्षपूर्वक आभ्यास करुन ती
भागवली जाईल.
लिफ्टची सुविधा, माॅर्डन एमिनीटीज,ईक्विपमेंट्स, स्वच्छ परिसर,ईत्यादी सुविधा
उपलब्ध आहेत.
सेंद्रीय भाज्या आणि
फळे देण्याचा पुर्ण प्रयत्न केला जातो. घरा बाहेर, घरासारखे सुरक्षित आणि आनंदी घरकुल
देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
मर्यादित ते दिर्घकाळ
राहण्याची सोय येथे शक्य आहे. अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी काॅल करा किंवा
स्वःता भेट द्या.
त्यांच्या गरजेला आणि
तुमच्या काळजीला, आमचे समाधान- "मधुरभाव"
Nice Initiative, its need of hour
ReplyDelete