Posts

Showing posts from September, 2019

Maitri Day Care for seniors

Image

विस्मरण हे ज्येष्ठांसाठी नवं नाही

Image
विस्मरण हे ज्येष्ठांसाठी नवं नाही. वयानुसार स्मरणशक्ती कमी होते हे तर सर्वमान्य वाक्य आहे, पण या वाक्याआड दडलेला धोका लक्षात न आल्यामुळे डिमेन्शिया या विस्मरणाच्या आजाराचं प्रमाण वाढत आहे. भारतातील ज्येष्ठांची संख्या मोठी आहे त्यातच या आजाराबद्दल असलेल्या अज्ञानामुळे ही समस्या आणखी गंभीर होत आहे. दरवर्षी 21 सप्टेंबरला जागतिक अल्झायमर दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त डिमेन्शिया व अल्झायमर  याविषयी... ------------------ हैदराबादवरून एक आजी आमच्या मधुरभाव वृद्धाश्रमात रहायला आल्या. त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत नोकरी करतो आणि तिथेच त्याच्या कुटुंबासोबत राहतो. तशा आजीही अनेकदा अमेरिकेला जाऊन आल्या ; पण तिथं त्यांचं मनच रमलं नाही, कारण केवळ आठवड्याच्याअखेरीलाच मुलगा, सून भेटायची ते फिरायलाही जायचे. उरलेला आठवडा ते कामात इतके व्यस्त की त्यांना बोलायलाही वेळ नासयचा. करमणुकीची फारशी साधनं उपलब्ध नाहीत आणि मराठी माणसंही त्या परिसरात फारशी नव्हती. सध्याच्या अनेक ज्येष्ठांची होते तशीच त्यांचीही अमेरिकेत राहणं म्हणजे सोनेरी पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षासारखी अवस्था झाली. त्यांच्या मुलानी ...