Fight with Corona Virus with MadhurBhav Seniors
इंटरनेट, वाय-फाय, टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया, फेसबूक, ट्विटर, शेअर बाजार, कॉर्पोरेट, काश्मीर या सगळ्याच परवलीच्या शब्दांचा एव्हाना सगळ्यांना विसर पडलाय. सकाळी उठताना आणि रात्री झोपतानाही केवळ एकच शब्द सर्वांच्याच तोंडावर आहे तो म्हणजे कोरोना. संपूर्ण आयुष्यावर कोरोनाची काळी दाट छाया पसरली आहे. ‘ हे महासंकट कधी टळेल कुणास ठावूक ?’ , ‘ लॉकडाऊन जूनच्या शेवटापर्यंत चालेलच ,’ ‘ जगाचं कसं व्हायचं ?’ असे प्रश्न आणि चर्चाच सध्या सुरू आहेत. ही जरी कोरोनाची एक बाजू असली तरीही दुसरीकडे मात्र प्रयत्न, प्रयत्न आणि कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. देशभरातील डॉक्टर, आरोग्य यंत्रणा, आरोग्य रक्षक, हॉस्पिटलमधील नर्स, कर्मचारी, पोलीस, सैन्य दलं, निमलष्करी दलं, जिल्हाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कोरोनावर संशोधन करणारे संशोधक या सगळ्यांनीच कोरोना विषाणूसमोर तेवढंच मोठं आव्हान उभं केलंय. माणसांचे बळी घेण्यासाठी आलेल्या या कोरोनाराक्षसाविरुद्ध हे सगळेच कंबर करून आत्मसमर्पण भावनेनी लढत आहेत. हा लढा नक्कीच यशस्वी होईल असा दुर्दम्य आत्मविश्वासच या सगळ्यांना लढण्यासाठीचं इंधन पुरवतो आहे. यामध्ये मधुरभाव वृद्ध...