Life Journey till now and battle continues.....



माझा वाढदिवस  विशेष मी आज्जी झाले . आणि देवाने दोन सुंदर नातवंडे दिली  प्रत्येक माणसाचे जीवन मध्ये उतार चढाव असतात तसे माझे आयुष्य पण सरळ मार्गी होते इंदूर हुन येऊन पुणे इथे शिक्षण पूर्ण केले . शिक्षण होत असताना लग्न झाले आणि मग नौकरी आणि करिअर या कडे लक्ष दिले आणि मग १९९० साली हर्षद चा जन्म झाला आणि दिवस मजेत होते आणि त्याची शाळा , अभ्यास आणि मार्क या पलीकडे त्याला  स्विमिन्ग , बॅडमिंटन , फॅन्सी ड्रेस , गाणे , पिकनिक , त्या मध्ये आज्जी आणि आजोबा चे पुणे येथे आगमन .अशी तारे वरची कसरत चालू होती . मग आयुष्य मध्ये एक कलाटणी झाली . २३ वर्ष चे लग्न  मोडले म दभेद वाढले आणि त्याचे रूपांतर वेगेळे होणे झाले . माझा मुलगा हर्षद माझा बरोबर होता त्या मुले सुसह झाले . माझा भावा ने कंपनी चा कारभार सांभाळायला सांगितले नि एक प्रकार प्रेरणा मिळाली  आणि तिचं  रूपांतर पुढे जाऊन स्वतः चे एक स्वतत्र अस्तिव निर्माण केले आणि  मुलाचे लग्न झाले आणि आज आमची फॅमिली खूप मोठी आहे मधुभाव चा निमित्ताने मला खूप आज्जी आणि आजोबांचे आशीर्वाद लाभले . काम करताना जीव भावाचे साथीदार मिळाले . मला हर्षद एवढेच नाव विठ्ठल , रोहित , पूनम  अनुजा ,संगीता राजेश आणि वसुधा , मनीषा , सुनीता ,  कांचन , सीमा , सुमन , स्वाती .... न संपणारी यादी आहे . माझे  जीवन समृद्ध झाले  कि आज मधुभाव चा काम मुळे  आज वर ६००  जेष्ठ नागरिकांना सेवा दिली , १०० पेक्षा जास्त alzhimers  dementia नि ग्रस्त झालेले नागरिक ,आज पण ५० हुन अधिक आज्जी आजोबा आणि ४० पेक्षा जास्त  स्टाफ मधुरभाव मध्ये आहे  त्या सगळ्याची मोठी जवाबदारी आहे ती पूर्ण पणे माझा हातून घडत आहे त्याचे समाधान आहे . मला आज्जी आजोबा साठी मी पुणे येथून इस-क्रीम तयार ( पॉट इसक्रीम ) साठी विरोध करणारा ( ते logistic परवडत नाही ) अमूल चे इस क्रीम आणून दे  (पण मला  त्या आज्जी आजोबांचे  पॉट इस-क्रीम पाहताना खूप आनंद होत होता )  . माझा मुलगा जेव्हा स्वतः त्याचा साठी barbeQ  तयार  करतो तेव्हा अभिमान होतो कि माझे सेवा आणि प्रेम  माझा मुला मध्ये पण आहे . त्याचे विशेष प्रेम प्राण्या वर जास्त आहे आणि भटकी कुत्री त्याची संगे संगती आहे . लोकडवून मध्ये गल्ली तीळ २५ भटकी कुत्र्यांना ( श्वान ) जेवण देत होता lockdown मध्ये घर बाहेर आणि गेला पण संध्याकाळी सगळे ना जेवण देणे कधी चुकवले नाही . आज वाढ दिवस निमित्त लिहणे चे कारण माझा आयुष्य मध्ये जे जे व्यक्ती आले आणि त्यांनी माझा काम वर आणि माझा वर विश्वास दाखवलं .  यश आणि अपयश दोन्ही पहिले अनुभवले पण चाल / काम कधी थांबले नाही . अगदी संकट काळात पण झोप नीट  लागत होती आणि कधी घाबरून गेलो नाही . अगदी उदाहरणे द्याचे झाले तर घर घेण्या  साठी पैसे तर नव्हते पण लोन पण कुठली बँक देत नव्हती , अश्यातच एक नातेवाईक नि सांगितले कि घर कशा साठी पाहिजे , कुलकर्णी आज्जी चा घरी राहा आणि हर्षद हॉस्टेल मध्ये राहील . माझा प्रश्न होता कि कुलकर्णी आज्जी चे वय ८७ वर्ष आणि ते गेल्या वर काय करायचे ? मग असे आज्जी आणि आजोबा शोधायचे का कि जिथे राहता येईल . तेव्हा मनाशी ठरवले कि हे दिवस पण जातील .  काही अनुभव धक्के देणारे आणि जवळ ची मंडळी असा पण सल्ला देतील तर अवघड आहे , माझा अनुभव फॅमिली कोर्ट मधील अगदी भयानक होता आणि तिथे नात्याची लक्तरं आणि पैशा साठी व्यापार करणारी मंडळी भेटली आणि डोळ्यांनी पहिले . मग कायदा हा बायका चा बाजू ने आहे पण तिचा सर्रास गैरवापर होत आहे आणि माझा सारखी महिला जिला न्याय मिळत नाही , मग कंपनी चा काम निमित्त पोलीस , गव्हर्मेंट ऑफिस येथे अनुभव आले    सिविल कोर्ट , फॅमिली , कोर्ट , इनकम  टॅक्स , आणि बरंच  काही अनुभव आले आणि बरेच शिकवून गेले या सगळ्या धाम धुमी  मधे  पण मना चा तोल कधी जाऊ दिला नाही आणि  शिक्षण सुरूच ठेवले   . जेष्ठ विषयक तज्ज्ञ TISS  मधून केले डिप्लोमा इन Dementia care  चे प्रशिक्षण घेतले online  कोविद-१९ काळ बरेच काही शिकवून गेला . माणसाने आपल्या गरजा किराणा , भाजीपाला आणि दूधवाला , औषध वॉल चा पुढे मिठाई चे दुकान , सोने दागिने , कपडे चप्पल पण जास्त लागत नव्हते .  नवीन ड्रेस पेक्षा चार घरातील कपडे जास्त उपयोगी पडत होते . अजून हि काही आयुष्यतील लढ़ाई  संपली नाही . आत्ता  मात्र वाटते कि उर्वरित आयुष्य आज्जी आजोबा चे सेवा मध्ये घालवावी आणि मुलं कडे संस्थे चे काम सोपवून जे करायचेच राहून गेले ते पूर्ण करावे  मला आता dementia आणि alzhimers चा सिनिअर्स साठी विशेष काम करावे हीच इच्छा आहे माझा कडून अशीच सेवा घडो आणि शेवट पर्यन्त काम करत राहो आणि मन स्वास्थ लाभो …






 




Comments

  1. Yogesh Parvate26 May 2022 at 03:22

    Khup Sundar Anubhav.. !! Aamhi tumachi aaji aajobanchi seva baghitali aahe. best wishes to al your future projects... !!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Today’s Truth: Why mend when you can replace?

All Seniors are Safe during COVID-19