"सोप्या आयुष्या पेक्षा,आनंदी आयुष्य महत्वाचे."

"Ageing with Joy"
मधुरभाव मधे, अनेकदा स्टाफ मेमबर्स,आजी-आजोबा, यांना संवाद साधताना पाहिले. एकमेकाच्या सहवासात हसताना, प्रत्येक क्षण जागताना पाहिले. खरचं हेवा वाटतो! आणि मनात सहज विचार येऊन जातो. कुठेतरी टेक्नोलॉजी, स्मार्टफोन, सोशलिस्ट होण्यात आपण ही मज्जा गमावून बसलोय. प्रत्येक क्षणाची आठवण बनवण्यात ईतके मग्न झालोय की, ते समोर असताना, निसटून जातात तरी समजत नाही.  नक्कीच ही काळाची गरज आहे. सोप्या आयुष्याचे साधन आहे. आता हेच पाहा, माझे हे विचारही मी या आधुनिक माध्यमातून आणि पद्धतीने मांडत आहे. ईतकच वाटते, की सोप्या आयुष्याची सवय अशी झाली आहे की आनंदी आयुष्याचे स्वपन धुरकट होत चालले आहे. म्हणतात ना, वडीलधार्यांकडून घेण्या सारखे खुप असते. आज एक नवा धडा मिळाला,  "सोप्या आयुष्या पेक्षा,आनंदी आयुष्य महत्वाचे." ही वाट धरून पाहूयात,ईतर पळवाटा सोडूयात.

                           'पळवाट'

कळत -नकळत कुठे  धाव घेतली  आहे ?
थोडा विचार  केला ,
की समजेल,
आश्चर्य  नक्कीच  वाटेल.
"
जमले तर बघू,वेळ नाही. "         
आहो,वेळ आपल्या  साठी आहे,
आपण  वेळे साठी नाही!  
"
बोलायचे आहे! पण, शब्द सापडत नाही."  
अंतकरणी शोधून  पाहा,
फेसबुक अन् व्हाॉट्सएप वर नाही.   
प्रेमाची  परिभाषा  बदलली  म्हणतात,
खरे तर  तिव्रता अटली आहे त्यातली,
ईमोजीज,अपडेटस अन् त्या  धडधडणार्या मोठया लाल ह्रुदयात घुसमटले आहे  सारे
गाठायचे असेल,तर आभाळही गाठाता येते,
पण,मनातच नसेल,
तर पळवाट ही शोधावीचं लागते.


Comments

Popular posts from this blog

Life Journey till now and battle continues.....

Today’s Truth: Why mend when you can replace?

All Seniors are Safe during COVID-19